Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अध्यासन केंद्राविषयी परिचय: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र, सोलापूर हे महान समाजसुधारक, लोककवी आणि लेखक आण्णाभाऊ साठे यांच्या विचार, साहित्य आणि कार्याचा प्रसार व संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे. हे केंद्र सामाजिक न्याय, शिक्षण आणि सांस्कृतिक जागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे आधुनिक काळातील एक थोर समाजसुधारक, कामगारांचे नेते, श्रेष्ट दर्जाचे साहित्यिक, विचारवंत होते. त्यांच्या जीवनकार्याची प्रस्तुतता आजही अधोरेखित करता येते. अशा एक महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने एका महत्वपूर्ण अध्यासनाची आवश्यकता होती ती गरज विद्यापीटाने पूर्ण केली आहे.

उद्देश:

  • अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा अभ्यास व प्रचार करणे.

  • शैक्षणिक जनजागृती निर्माण करणे.

  • साहित्य,कला आणि संस्कृती याद्वारे सामाजिक एकता व बंधु वाढविणे.

  • युवकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे धडे देऊन सामाजिक बदलाचे नेतृत्व करण्यास सक्षम बनवणे.

  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची परिपूर्ण माहिती सर्वसामान्य लोकांना तसेच संशोधक, अभ्यासकांना करुन देणे ऐतिहासिक दृष्टिकोणातून त्यांच्या कार्याचे महत्व, मौलिकता आणि वैशिष्ट्यपूर्णता यांची माहिती करुन देणे.
  • अण्णा भाऊ साठे याचे धर्मविषयकचे, विज्ञानविषयक, साहित्यविषयक तसेच समाजाविषय कच्या प्रश्नांवरील विचारांचे स्वरुप सर्वसामान्यांना व अभ्यासकांना माहित करुन देणे.
  • अण्णाभाऊंच्या समग्र जीवनकर्तृत्वाची प्रस्तुतता जनसामान्यांच्या मनावर ठसेल, अशा पध्दतीने प्रतिपादन करणे, त्यांच्या वैचारिक, मानवतावादी विचारांचा प्रसार प्रचार करणे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कविता, शाहीरी वाड्मय, कांदबरी, नाटक, प्रवासवर्णन, लोकनाटय अशा अनेकविध लेखनाची तसेच प्रवारावर्णनादी स्वरुपाच्या ललित, दलित, ग्रामीण आणि लोकसाहित्य विषयकच्या लेखनाची माहिती व महत्वपूर्णता सर्वसामान्यांपर्यंत कळेल अशा अनेकविध उपक्रमांचे नियोजन करणे, उपक्रम राबविणे.

केंद्राची कार्ये:

  • अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर संशोधन, परिसंवाद आणि चर्चासत्रे आयोजित करणे.

  • मोफत शिक्षण व साक्षरता अभियान, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि कौशल्य विकास कार्यशाळा.

  • सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन, नाट्यप्रयोग आणि चित्रप्रदर्शनांद्वारे समाजप्रबोधन.

  • ग्रंथालय व वाचनालय सुविधा उपलब्ध करून देणे.

  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक चळवळीतील योगदान, समताधिष्ठीत समाजनिर्मितीचे स्वप्न, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे कार्य, न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधूभावाच्या, धर्मनिरपेक्षता मानवतावादाच्या विचारांचा प्रसार प्रचारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यावर सांगोपांग चर्चा करण्याच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन करणे.
  •  वरीलप्रमाणे आयोजित केलेल्या चर्चासत्रातील शोध निबंध व चर्चासार अनेकविध छोटया मोठ्या पुस्तिकांच्या रुपाने तयार करणे.
  • अण्णाभाऊ साठे यांच्या वर नमूद केलेल्या कार्याच्या विविध पैलूंवर अण्णाभाऊ यांच्या वरील अभ्यासकांची अनेकविध व्याख्याने आयोजित करणे व ती पुस्तिकांच्या रुपाने प्रस्तृत करणे.
  • अण्णाभाऊ साठे यांचे धर्मजातीविषयकांचे तत्वज्ञानापर लेखनः समाजशास्त्रीय पध्दतीचे  संशोधनपर, वाङमयीन संशोधनात्मकतेचे कार्य तसेच वैचारिक स्वरुपाचे लेखन, त्यांचे मानवतावादी तत्वज्ञानपर लेखन त्यांनी लढलेला कामगारलढा, गिरणीकामगारांच्या चळवळीसाठी दिलेले योगदान, त्यांच्या वाइ मयाचे भाषाशास्त्रीय दृष्टिकोणातूनचे वाइ मयीन मूल्यमापन करुन संशोधन करणे, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून संबंधित विद्याशाखांतील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासंबधी प्रयत्न करणे.
  • अण्णाभाऊ साठे यांचे संबंधी अभ्यास करणारी व त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यास सहाय्यभूत ठरतील अशा प्रकारची तरुण अभ्यासक, संशोधक मंडळे स्थापन करणे. शहरी आणि ग्रामीण परिसरातील शिक्षणसंस्थामध्ये तसेच नागरिकांत संशोधन मंडळे स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे व त्यांना ग्रंथरुपाने सहाय्य करणे, मार्गदर्शन करणे.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची हस्तलेखिते, दुर्मिळ फोटो, वापरातील वस्तू, त्यांच्या कांदबरीवरील निर्माण झालेल्या मराठी, हिंदी चित्रपटांचे संकलन, संवर्धन करणे, त्यांच्या नावाचे वस्तूसंग्रहालय उभे करणे.
  • महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरावरील, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळांचे आयोजन करणे. दलित साहित्यकावरील संशोधन, अभ्यासकांना मार्गदर्शन करणे.
  • बहुजन समाजातील अंधश्रध्दा, व्यसनाधिनता, अनिष्ठ रुटी, प्रथा परंपराविरोधी जनजागृती करणे. मातंग समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करणे. मांगबोली (आंबूजीभाषा) वाङमयीन व भाषाशास्त्रीय अभ्यास करणे इ.
Scroll to Top