Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अण्णाभाऊ साठेंचा जीवनपट

  • १. जन्म: १ ऑगस्ट १९२०
  • २. जन्मस्थळ : वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली
  • ३. आईचे नाव : वालुबाई
  • ४. वडिलांचे नाव : भाऊ सिधोजी साठे
  • ५. वडील भाऊ साठे १९२५ च्या सुमारास मुंबईला गेले. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बागेत काम करायला लागले.
  • ६. अण्णाला शाळेत घातले पण दुसऱ्याच दिवशी शिक्षकांनी मारले आणि दीड दिवसानंतर शाळा कायमची सुटली.
  • ७. याच काळात बापू साठे या चुलत भावाच्या तमाशात साथ देऊ लागले.
  • ८. १९२९-३० च्या सुमारास वडिलांची मुंबईची नोकरी संपली. ते वाटेगावला परत आले.
  • ९. १९३१ साली भाऊ साठे पत्नी, अण्णा, शंकर आणि लहान मुलगी यांना घेऊन मुंबईला आले.
  • १०. मुंबईचा २२७ किलोमीटरचा प्रवास पायीच केला.
  • ११. भायखळ्यातील चाँदबीबी चाळीत खोली घेतली.
  • १२. प्रारंभी अण्णा एका कापड विक्रेत्यासोबत कापडाचे गाठोडे घेऊन मुंबईत कपडे विकत फिरले.
  • १३. पुढे ते गिरणी कामगार झाले.
  • १४. याच काळात हे जिद्दीने साक्षर व्हायला लागले.
  • १५. १९३९ मध्ये वडिलांचा मृत्यू
  • १६. याच काळात कोंडुबाई या काळगाव, ता.पाटण, जि. सातारा येथील अशिक्षित तरुणीशी लग्न
  • १७. भायखळ्यानंतर ते चेंबूरच्या झोपडट्टीत राहू लागले.
  • १८. याच काळात दादर (पूर्व) च्या मोरबाग मिलमध्ये ते कामगार म्हणून लागले.
  • १९. कामगार मित्रांच्या मदतीने त्यांना माटुंगा लेबर कॅम्पमध्ये खोली मिळाली.
  • २०. इथे ते १९४५ मध्ये स्थिरावले.
  • २१.१९४२-४३ च्या सुमारास अनेक उत्सवांमधून पोवाडे म्हणून लागले.
  • २२.१९४२ साली ‘नानकिंग नगरापुढे’ आणि ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ लिहिला.
  • २३.१९४४ : अमरशेख, दत्ता गव्हाणकर आणि अण्णा भाऊ यांना एकत्र आणून साम्यवादी कार्यकर्त्यांनी ‘लाल बावटा कलापथक’ स्थापन केले.
  • २४.साम्यवादी पार्टीचे कार्डहोल्डर झाले
  • २५.साप्ताहिक लोकसाहित्य, युगांतर अशा पक्षपत्रांमधून वार्तापत्रे लिहू लागले, त्यांची ही पत्रकारिता.
  • २६. १९४३-४४ साली अण्णांनी पहिल्या पत्नीला आणि आईला वाटेगावी पाठविले.
  • २७. १९४५ पूर्वी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहिले.
  • २८. १९४५ साली जयंवताबाईशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
  • २९.१९४५ ते १९६७ घाटकोपरच्या चिरागनगर झोपडपट्टीत वास्तव्य.
  • ३०.१९४९ कथालेखनाला प्रारंभ
  • ३१.१९४९ मध्ये ‘मशाल’ साप्ताहिकात ‘माझी दिवाळी’ नावाची पहिली कथा प्रकाशित
  • ३२.१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट
  • ३३. ‘खुळवाडी’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित, १९५७
  • ३४. २ मार्च १९५८ : महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक अध्यक्ष बी.सी. कांबळे
  • ३५.१९५९ ‘फकिरा’ कादंबरी प्रकाशित
  • ३६. १९६१ फकिराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  • ३७. १९६१ : ‘माझा रशियाचा प्रवास’
  • ३८. वैजयंता या चित्रपटाला ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक
  • ३९. १९६२ : साताऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयात व्याख्यान
  • ४०.१९६७ च्या सुमारास शासनाने गोरेगावच्या सिद्धार्थनगरात क्रमांक २ च्या गृहनिर्माण वसाहतीत तीन खोल्यांचे घर दिले. चिरागनगरातून ते मग इथे राहायला आले.
  • ४१.१९६८ मध्येच शासनाने कलावंत मानधन म्हणून महिन्याला तीनशे रुपये दिले
  • ४२. ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ या नावाची जीवनी लिहिण्याचा संकल्प. पण ही जीवनी लिहून झाली नाही.
  • ४३.१८ जुलै १९६९ रोजी दुपारी गोरेगावमधील राहत्या घरी निधन
Scroll to Top